अहमदनगर ब्रेकिंग : त्या नगराध्यक्षांचा अखेर ना’राजीनामा …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जनता कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त असताना देवळाली प्रवरामध्ये नगराध्यक्ष आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगले आहे.

नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर हुकूमशहाचे आरोप करीत विरोधकांनी केले,या मुळे विरोधकांच्या डावपेचाला कंटाळून नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा ‘ना’राजीनामा देऊन त्यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष कदम यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या नाराजीनाम्यात माझ्यासह विरोधकांनाही ‘क्वारंटाईन’ करण्याची अजब मागणी केल्याने देवळाली प्रवरा शहरातील राजकारणाचा रंगलेला डाव सध्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे.

सध्या करोना व्यवस्थापना वरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी नगराध्यक्ष हे करोना व्यवस्थापनाच्या नावाखाली हुकूमशाही करीत असल्याचे सर्वपक्षीय निवेदन तहसीलदारांना दिले होते.

हे प्रकरण थंड होत नाही तोच नगरपरिषदेच्या दोन कर्मचार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर लगेच म्हणजे सोमवार दि.18 मे रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाचा राजीनामा संबंधितांकडे पाठवून दिला.

कदमांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचा राजीनामा दिल्याला चोवीस तास होत नाही तोच सर्व चौक्या पाहारे पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात गस्त घालून दुपारी बारानंतर अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे सांगितले.

ज्यांचे चालू होते, त्यांना चांगलीच तंबी दिली. तर सकाळी सोसायटी डेपोवर विनाकारण गर्दी करणार्‍यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला.

दरम्यान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पाठविलेल्या राजीनाम्यात म्हटले, मी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा नगराध्यक्ष असलो तरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

म्हणून आपणास विनंती करतो की, सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मला आपत्ती व्यवस्थापनाच्या जबाबदारीतून मुक्त करावे व माझ्या गावाला करोना संकटापासून वाचविण्यासाठी माझ्यासह सर्वच राजकीय व सामाजिक द्वेष पसरविणार्‍या

निवेदन देणार्‍या सर्वच व्यक्तींना आपल्या स्तरावरून समज देऊन क्वारंटाईन करावे व बाहेर पडण्यास बंदी घालण्यात यावी, अथवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतूदीच्या आधारे त्यांना इतरत्र हलवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment