अहमदनगर ब्रेकिंग : दोस्त दोस्त ना रहा; दोन मित्रांनीच केला ‘त्या’ मित्राचा खून !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   दोन मित्रांकडून दारू पिताना झालेल्या भांडणातून एका मित्राचा खुन झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे घडली.मृत मित्र आणि त्याचा खून केलेले दोघे पारनेर तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत.

हे तिघे जण नेहमी कामासाठी एकत्रित या भागात येत होते.गुरुवारी, दि.26 रोजी एकनाथ दत्तात्रय जाधव,वय 37, वामन विठ्ठल खोपटे, वय 40 व आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी, वय 23, सर्व राहणार जवळा

हे तिघे सकाळी 11: 30 च्या सुमारास आप्पा गवळी याच्या हिरो होंडा मोटारसायकल क्रमांक एमएच-12-0188 या मोटरसायकलवर बसून मलठण तालुका शिरूर येथे आले होते.

ते नेहमी एकत्रित कामासाठी या परिसरात येत जातात व त्यांना दारूचे व्यसन होते, दुपारी 02:30 वाजण्याच्या सुमारास आमदाबाद,ता. शिरूर येथे एका मंदिरामागे त्यांनी एकत्रित बसून दारू पिली.

त्यानंतर त्यांच्यामध्ये त्याच ठिकाणी भांडणे झाली आणि त्या भांडणानंतर वामन विठ्ठल खुपटे आणि आप्पा उर्फ रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव यास मारहाण केली

आणि त्याचा गळा आवळून खून करून जीवे ठार मारले आणि त्याला आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या नाल्यात फेकून दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment