अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दौंड येथे आढळलेल्या अजून एका कोरोनाबाधित रुग्णामुळे श्रीगोंद्यातील बफर झोनची दोन गावे प्रतिबंधित क्षेत्रात आली आहेत.
निमगावखलू व गार या दोन गावे सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दौंड येथील गांधी चौकातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे त्या परिसरापासून तीन किलोमीटर अंतरावरील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले गेले.
यात श्रीगोंदे तालुक्यातील गार व निमगावखलू ही दोन गावे आली आहेत.
त्यामुळे या गावांच्या सरहद्दी सील करून गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सगळे व्यवहार पूर्ण बंद केला आहे.
गावातील लोकांवर फिरण्यावर प्रतिबंध घातला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com