अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे अनिल खंडू गोर्डे( वय ४५) व कार्तिक गोर्डे (वय १९) या चुलत्या पुतण्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली.
घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कार्तिक सुनील गोर्डे पिंपळगाव निपाणी येथील शेततळ्यातील लिकेज काढत होता.
मात्र कागदावर साठलेल्या शेवाळावरून पाय घसरून पाण्यात पडला. पुतण्याला वाचवताना चुलत्याचाही पाण्यात बुडून मृत्यु पावला. कार्तिक व अनिल गोर्डे हे शेततळ्यावर गेले होते कार्तिकला फारसे पोहता येत नव्हते.
त्याने शेततळ्यात उतरून ट्युबवर बसून प्रयत्न सुरू केले व मोटरसायकलच्या ट्यूबची हवा गेली आणि अचानक शेवाळावरून त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला.
त्याचवेळी त्याचे चुलते अनिल खंडू गोर्डे हे धावत आले व शेततळ्यात उडी घेऊन त्यांनी कार्तिक यास वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. कार्तिक घाबरलेला होता की त्याने चुलते अनिल यांना जोराची कवळी घातली ती सुटता सुटेना.
शेततळ्यात खूप पाणी व शेवाळ असल्याने ते त्यात अडकले व दोघेही शेततळ्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. अनिल हे पट्टीचे पोहणारे होते मात्र त्याला ही मृत्यूला सामोरे जावे लागले. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com