अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील जवळा परिसरतील मामा-भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागून या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बंधाऱ्यावर जवळील विजेच्या खांबाची तार तुटून शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात पडली होती. तार तुटल्याचे लक्षात न आल्याने शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला.
सुभाष सोमा जाधव (वय ३८), सोनाली देशमुख (वय १९) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com