अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली.
यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादात एका तरुणाने स्वतः कडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या हाताच्या पंजाला दुसरी मानेला तर तिसरी गोळी कानाजवळ लागली.
आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमला. गोळीबारानंतर ते दोघे तरूण पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com