अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.
त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यात सामान्यांबरोबच अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोरोनाची ‘लागण झाली असून त्यांच्या पत्नी आणि डॉक्टर मुलासही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल खा. सदाशिव लोखंडे यांना त्रास जाणवू लागल्याने श्रीरामपूर येथे त्यांची कोरोनाची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या टेस्टचा रिपोर्ट आज प्राप्त झाला.
यामध्ये त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलाचीही रॅपिड टेस्ट करण्यात आली असता तीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे खा. लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी सांगितले.
खा. लोखंडे हे आपल्या निवासस्थानीच असून डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह 12 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
तर तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये तालुक्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याचा कोरोना रुग्णांचा आकडा 636 झाला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved