अहमदनगर ब्रेकिंग : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आला आहे.पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. रेखा जरे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कारमध्ये येत असताना जातेगाव घाटात हत्या करण्यात आलेली आहे. 

घाटातून रेखा जरे यांच्या फोर व्हीलर गाडीला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करीत रेखा जर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये रेखा जरे जागीच मृत्यू झाला आहे.

त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र,हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना रुग्णालयात दाखल करण्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!