अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली आहे. या घटनेमुळे चांदासह परिसरात खळबळ उडाली आहे.
नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय ४०) हे नदीजवळ चौकात थांबले होते.
त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आणि पसार झाले दहातोंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमक कशातून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
हल्ल्याचे नेमके कारण समजलेले नाही. अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम