अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२,

नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील १० रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले.

दरम्यान, आज एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर ०२, राहाता ०५,पाथर्डी १४, नगर ग्रा. ०७, श्रीरामपूर ०५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ०३, राहुरी ०१,शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड ०३, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३७६२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १७०२
  • मृत्यू: ७८
  • एकूण रूग्ण संख्या: ५५४२
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment