अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 1652 रुग्ण वाढले आहेत,अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत –


३ राज्यांतील स्थिती चिंताजनक :- कोरोना महामारीच्या अनुषंगाने आगामी ४ आठवडे देशासाठी अत्यंत बिकट ठरण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिला आहे. ‘देशात कोरोना महामारीची तीव्रता वाढली आहे. दैनंदिन रुग्ण व बळींच्या बाबतीत महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगड या ३ राज्यांतील स्थिती चिंताजनक बनली असून,
आगामी ४ आठवडे अत्यंत बिकट :- आगामी ४ आठवडे आपल्यासाठी अत्यंत बिकट ठरणार आहेत’, असे मंत्रालयाने म्हटले आहे. महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकभागीदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. ‘देशातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेच्या सामना :- देशात पुन्हा एकदा २०२० मधील स्थिती उद्धभवली आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त वेगाने सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेच्या सामना करावा लागणार आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा सव्वा कोटी पार गेला आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात :- गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूचा आकडा कमी झाला आहे. परंतु सक्रिय रुग्ण वेगाने वाढत आहेत, त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ७ लाख पार झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून राज्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
 - अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
 













