अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९९३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत ३१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०५, राहता ०४, संगमनेर ०३, शेवगाव ०१ आणि श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०३, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०४, पारनेर ११, राहाता ०७,
संगमनेर ०७ आणि शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ०३, जामखेड ०३, कर्जत ०२,
नगर ग्रामीण ०१, पारनेर ०२, राहता ०४, राहुरी ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३६,
जामखेड ०३, कर्जत ०२, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण २६, नेवासा ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०६, राहाता ११, राहुरी ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:७०५५७
- उपचार सुरू असलेले रूग्ण: ९९३
- मृत्यू:११०६
- एकूण रूग्ण संख्या:७२६५६
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved