अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१

आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.
दरम्यान, आज सकाळी पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघे असे पाचजण बाधित आढळून आले होते. त्यामुळे आजच्या दिवसात बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या २१ इतकी झाली आहे.
आज सकाळी एकूण ३६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: १९८
- बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४५५
- मृत्यू: १८
- एकूण नोंद रुग्ण संख्या: ६७१
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews