अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  8.45 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले

तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली.

जिल्हा रुग्णालयात अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील ३ तर श्रीगोंदा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर ११ (घुलेवाडी २, मालदाड रोड ०३, भारत नगर ०१, जनता नगर ०१, निमोण ०२, जोर्वे रोड रहमद नगर ०१, अरगडे गल्ली ०१)

नगर मनपा १७ (विनायक नगर ०४, शाहुनगर केडगाव ०१, श्रीराम नगर ०१, सुभेदार गल्ली ०१, भवानीनगर ०१, सावेडी ०३, कावरे मळा ०१, नगर शहर ०५)

  • नगर ग्रामीण ०२ (पोखर्डी ०१, पितळे कॉलनी, नागापूर ०१),
  • राहाता ०४ (शिर्डी ०१, पिंपरी निर्मळ ०१, सोनगाव पठारे ०१, कानकुरी ०१)
  • राहुरी ०३ ( म्हैसगाव ०१ तामर खेडा ०१, राहुरी शहर ०१)
  • श्रीगोंदा ०२ (चिखली ०१, श्रीगोंदा ०१)
  • श्रीरामपूर ०१ (ममदापूर), अकोले ०१, भिंगार ०१, पाथर्डी ०१ (त्रिभुवनवाडी)

दरम्यान, आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७२ रुग्णांची नोंद झाली.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण: ३६०
  • बरे झालेले रुग्ण: ६४९
  • मृत्यू: २६
  • एकूण रुग्ण संख्या: १०३५

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment