अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १४९ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५१ ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२२७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत ९२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१,
संगमनेर १२, शेवगाव ०२, श्रींगोंदा ०१, श्रीरामपूर ०१, इतर जिल्हा ०१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ९२ जण बाधित आढळुन आले.
यामध्ये, मनपा १६, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपर गाव ०५ नगर ग्रामीण ०७,, पारनेर ०३, पाथर्डी २०, राहाता ०७, संगमनेर २४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, अकोले ०७, जामखेड ०३, कर्जत ०८, कोपरगाव १८, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०९ ,
पारनेर १३, पाथर्डी १२,, राहाता २१, राहुरी ०२, संगमनेर २३, शेवगाव १४, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:६५१४९
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १२२७
- मृत्यू:१०१५
- एकूण रूग्ण संख्या:६७३९१
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com