अहमदनगर – पांढरीपूल परिसरात असणार्या एका हॉटेलच्या शेड मध्ये सुरू असणार्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला.
दरम्यान ताब्यात घेतलेल्या महिलांची विचारपूस करणार्या पोलिसांवर चालकांने हल्ला चढविला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्सार गफुर शेख, वाजिद नसीर शेख, मन्सूर रहमानभाई पठाण, बाबा निजाम शेख, गंगाराम जानकु काळे, रशिद सरदार शेख यांच्यासह पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पांढरीपूल वरील एका हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि.12 रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना 5 महिलांसह 3 पुरूष व चालक आढळून आले.
त्यादरम्यान सर्वांची विचारपूस करत असतांना गंगाराम काळे व रशिद सरदार शेख यांने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असतांना गंगाराम काळे व रशिद सरदार यांने पोलिसांवर हल्ला चढविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी एमाआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..