नगर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात सहायक पोलिस निरीक्षक असलेले नगरचे गणेश सुदर्शन येमुल (वय ४०) यांचे पुणे येथे ह्यदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
गणेश येमुल हे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे प्रतिनियुक्तीवर स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. गणेश येमुल हे २००२ मध्ये नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. खात्यांतर्गत परिक्षा देऊन ते उपनिरीक्षक झाले होते.
त्यांच्या पत्नी पुणे येथे नोकरीला आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब पुणे येथे राहत होते. गुरुवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.