पाथर्डी :- तालुक्यातील शिरापूर येथील पती-पत्नीने पैठण येथील जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने शिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सचिन विठ्ठल लवांडे (वय 29) व पत्नी कीर्ती सचिन लवांडे (वय 24) हे दोघे शनिवारी भाऊबीजेनिमित गावी गेले होते,
रविवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो झाला नाही.
सोमवार दि 4 रोजी सकाळी सकाळी पत्नीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगतांना आढळुन आला. दुपारनंतर पतीचा मृतदेह आढळुन आला.
यावेळी नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सोमवारी या दोघाचें मृतदेह जायकवाडी धरणाच्या पाण्यात तंरगतांना आढळुन आले. सहा महिण्यापुर्वी या दापत्यांचा विवाह झाला होता.
दरम्यान जोडप्याने घरातून होणाऱ्या अवहेलनेमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. घरच्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती.
त्यामुळे सुखात सुरू असलेला संसार या जोडप्याने संपवला.
या जोडप्याचं एकमेकांवर अतूट प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला. एकमेकांचा हात रुमालाने बांधून त्यांनी धरणात उडी घेतली.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या तरुण दाम्पत्याचं लग्न झाल्यानंतर किर्ता यांचा कुटुंबीयांकडून छळ करण्यात येत होता.
हा छळ पतीला सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार