अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टराला अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती.

त्यानुसार सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने रुग्णालयात जाऊन डॉ. गंधे याला गर्भपात करताना रंगेहाथ पकडले. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप मुरंबीकर यांना माहिती देण्यात आली.

डॉ. मुरंबीकर हे रात्रीच पथकासह जखनगाव येथे दाखल झाले होते. डॉ. गंधे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment