अहमदनगर मध्ये आता ‘या’ आजाराचा धोका,50 जणांना झाली लागण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात  तब्बल ५० जणांना “सारी’ची लागण झाली आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीत २३ आणि ग्रामीण भागात २७ रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. कोरोनाबरोबरच सारीचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे.

पावसाळ्यात सारी आजाराचे रुग्ण वाढण्याची अधिक शक्यता आहे.जिल्हा प्रशासन या साथरोगांबाबत अधिकच सतर्क झाले आहे.

पावसाळ्यातील साथरोगांना अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

सारी म्हणजे काय , त्याची लक्षणे कोणती ?
कमी कालावधीत, म्हणजे सात दिवसाच्या आत ताप, खोकला आणि दम लागणे किंवा श्वास घेता न येणे या तक्रारी घेऊन रुग्ण येतो.

त्यावेळी डॉक्टरी भाषेत त्याला सारी अवस्था असे म्हणतात. उपचारादरम्यान विविध चाचण्या करून या आजाराचे नेमकं निदान शोधण्याचे काम सुरु असते.

कशाने होतो सारी ?
व्हायरल इन्फेकशन स्वाइन फ्लू, कोरोना, बॅक्टरीअल इन्फेकशनमुळे (जिवाणू संसर्ग) सारी होऊ शकते. न्युमोनिया हे सुद्धा सारीचे एक लक्षण आहे.

कोरोना या आजारात सारीची बरीच लक्षणे साम्यपणे आढळतात. त्यामुळे सर्व सामान्य जनता सारी नवीन विषाणूं आहे की याबद्दल विचार करताना दिसत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment