अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक दिनांक ३१ डिसेंबर,
२०२० च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारी २०२१ च्या पहाटे सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कळविले आहे.
बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक बंद राहणार असल्याने अहमदनगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुकीसाठी मार्ग हा बेलवंडी फाटा-देव दाइस्थान- धावलगाव
– पिंपरी कोळंडर -उक्कडगाव-बेलवंडी-अहमदनगर दौंड महामार्गावरुन -लोणी व्यंकनाथ -मढे वडगाव -काष्टी -दौंड -सोलापूर पुणे महामार्गामार्गे-पुणे असा असेल.
अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग हा केडगाव बायपास-अरणगाव बायपास-कोळगाव-लोणी व्यंकनाथ-मढे वडगाव-काष्टी-दौंड-सोलापुर पुणे महामार्गामार्गे-पुणे या मार्गे वाहतुक होईल
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve