मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण तापले आहे. ओबीसी नेते याला विरोध करत आहेत. यावरून वातावरण तापलेले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरे करत आहेत. ठीक ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. ते काल अहमदनगरमधील शेवगाव येथे आले होते. यावेळी सभास्थळी त्यांच्यावर ३० जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली गेली. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत अनेक मुद्दे मांडले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील –
मराठा समाजाला जर सत्तर वर्षापूर्वी आरक्षण दिले असते, तर आज मराठा समाज प्रगत झाला असता. परंतु जाणूनबुजून आरक्षण न देण्याचं हे सत्तर वर्षे षडयंत्र रचले गेले असे ते म्हणाले. आता ३२ लाख पुरावे सापडले आहेत. दीड-दोन कोटी मराठा समाज त्याचा लाभ घेऊ शकतो.
नगर जिल्ह्यात सव्वातीन लाख नोंदी सापडल्या आहे आहेत. सुमारे ९ ते १२ लाख मराठ्यांना त्याचा फायदा होईल. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण देताना विरोध कधीच केला नाही,
आरक्षणाला विरोध करणारा एक माणूस दाखवून द्या. मराठा समाज सर्वांसाठी उभा राहिला, सत्तर वर्षांत अनेक पक्ष मोठे केले. आपले मानून नेते मोठे केले, गरज पडेल तेव्हा मदत करतील वाटत होते. मात्र, ओबीसींसह मराठा नेतेही पाठीमागे उभे नाहीत असा घणाघात जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
सभेची जय्यत तयारी
या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली होती. पाच तास उशीर होऊनही हजारो लोक सभेला आले होते. सभास्थळाच्या प्रवेश द्वारा जवळ वैद्यकीय मदत कक्ष उभारले होते. ठिकठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी होते.
सभास्थळी पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सभेसाठी येणाऱ्यांना पाणी पिशवी दिली जात होती. सकल मराठा समाजाचे भगवी टोपी, पांढरे वस्त्र परिधान केलेले ३०० स्वयंसेवक यावेळी सुरक्षेसाठी व सेवेसाठी उपस्थित होते.