अहमदनगर :- न्यायालयात थुंकणाऱ्या एका वकिलासह चौघांविरुद्ध बुधवारी कारवाई करण्यात आली. प्रत्येकाकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आवारात तंबाखू, पान, मावा, गुटखा खाऊन थुंकून भिंती खराब करण्यात आल्या आहेत.

न्यायालयातील भिंतीवर थुंकू नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही वकील, पक्षकार व इतर जण तंबाखू खाऊन थुंकून भिंती खराब करत आहेत.
बुधवारी न्यायालयात थुंकणाऱ्या चार जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
वकील भागचंद काळे बुधवारी दुपारी न्यायालयात आले होते. त्यांना न्यायालयाच्या भिंतीवर थुंकताना पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांच्याकडून बाराशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- विवाहानंतर मूल होत नाही? हे वास्तु उपाय एकदा तरी करून पहा
- सातव्या वेतन आयोगाच्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता
- Explained : सत्यजित तांबेंचा ‘बालिशपणा’ अन् मामांची ‘परिपक्वता’, भाजपला हेच हवं होतं?
- कामाची बातमी ! आता महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार, वर्गातच होणार प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी
- पोस्ट ऑफिसच्या 3 वर्ष FD योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?