अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना रामनवमी, हनुमान जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रशासनाने परवानगी नाकारली. परंतु, रमजानच्या काळात अजान करण्याकरिता प्रशासनाने 23 मशिदींमध्ये शहरात परवानगी दिली आहे.
पोलिस प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असून मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही मनसेकडून जिल्हा सचिव नितीन भुतारे व सुमित वर्मा यांनी उपस्थित केला आहे.
24 मार्च पासून संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहिर केला आहे.दरम्यान रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरात साजरी करण्याचे आवाहन केले.
त्यानुसार हिंदु बांधवांनी घरातच जयंती साजरी केली. तसेच हिंदू समाजबांधवांना स्पीकर लावण्याची परवानगी पोलिस अधिकार्यांनी दिली नाही. परंतु, लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम समाजातील अजानला परवानगी पोलिस प्रशासनाने दिली आहे. हा एक प्रकारे दुजाभावच आहे.
रमजानचा रोजा सोडण्यासाठीच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती मुस्लीम बांधवांना व्यवस्थितरित्या माहिती होते.तरी सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये मशिदीमधून अजानची गरज काय? असा सवाल भुतारे व वर्मा यांनी उपस्थित केला आहे.
तसेच प्रशासनाकडून दोन समाजामध्ये दुजाभाव का केला जातो असा प्रश्न उपस्थित केला जात असून दररोज महत्वाच्या मंदिरात आरतीची परवानगी मागितली तर ती मिळते का? असा सवालही भुतारे व वर्मा यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®