काजवे पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा परिसरात काजवे पाहायला गेलेल्या संगमनेर मधील पर्यटकांची कार मुतखेल गावाजवळ दरीत कोसळली.

अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

संकेत यशवंत जाधव (रा.चिंचोली गुरव, ता. संगमनेर-हल्ली मुक्काम-इंदिरानगर, संगमनेर) असे या अपघातातील मृत गाडी चालकाचे नाव आहे.

तर दत्ता यशवंत शेणकर (वय 29) व पांडुरंग तान्हाजी जाधव (वय 26), प्रवीण सुभाष डफेकर (वय 24), रा. घोडेकर मळा, संगमनेर हे तिघे जखमी झाले.

त्यापैकी दोघांवर नाशिक येथे उपचार सुरू आहे तर एक जण किरकोळ जखमी आहे.

याबाबत पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment