आजारपणाला कंटाळून युवकाची आत्महत्या

Published on -

अकोले :- रुंभोडी येथील एका तरुणाने आजारपणाला कंटाळून गुरूवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हौशीराम गंगाधर मधे (वय २५) असे त्याचे नाव आहे.

तो अनेक दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार सुरू होते. मात्र, दीर्घ आजारपणामुळे त्याला नैराश्य आले. त्यातूनच त्याने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

हौशीरामचा भाऊ पंढरीने दिलेल्या खबरीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe