आ. शिवाजी कर्डिले यांच्या पुत्राविरुद्ध शिवसेना आक्रमक

Ahmednagarlive24
Published:

नगर : भारतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु आहे. तथापि, नगर शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय अनाधिकृत फलक लावण्यात आले आहेत.

असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भारतात लोकसभा निवडणूक २०१९ मुळे आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे.

तथापि,  आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नगर शहरात व नगर दक्षिणेत अनाधिकृत फलक लावले आहेत.

यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित २३ मार्च ला शिवसेनेने फलक लावले होते त्या वेळी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेते. कायदा सर्वांसाठी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment