अहमदनगर Live24 टीम :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक 30 एप्रिलपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना य फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विकेत्यास गर्दी टाळून ) परवानगी राहील.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार दि. 14 एप्रिल 2020 पर्यत भरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. महाराष्ट्रातील लॉकडाऊन हे दिनांक 30 एप्रिल 2020 चे मध्यरात्री पर्यत लागू करण्यात आलेले आहे.
त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कमल 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®