महापौरांच्या निवडीला महिना उलटूनही स्थायीसाठी मुहूर्त मिळेना !

Published on -

अहमदनगर :- अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. काेणतीही करवाढ करायची असेल, तर १९ फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणे बंधनकारक असते.

मात्र, अद्याप स्थायी समितीच अस्तित्वात नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. स्थायी समिती सदस्य निवडीला होणारा विलंब सर्वसामान्य नगरकरांच्या पथ्यावर पडणार आहे.स्थायी समितीबरोबरच स्वीकृत सदस्य निवडीचाही विषय प्रलंबित आहे.

पहिल्या महासभेतच करायला हवी निवड.

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौरपदी बाबासाहेब वाकळे व उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड झाली. निवडीनंतर होणाऱ्या पहिल्या महासभेत १६ नगरसेवकांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड केली जाते. या १६ सदस्यांमधून एकाची सभापतिपदी वर्णी लागते.

अद्याप महासभेचा मुहूर्तदेखील नाही.

महापौरांची निवड होऊन महिना उलटला, तरी स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांच्या निवडी झालेल्या नाहीत. महापौर निवडीनंतर पहिल्या महासभेचा मुहूर्तदेखील अद्याप काढण्यात आलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe