ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतन कपात करणारा शासननिर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय रद्द करुन शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच अदा करणे आवश्यक आहे. या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलन केले.

आता पुन्हा याच मागणीसाठी 28 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र व्यापी संप/ कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य आयटक ग्रामपंचायत महासंघाच्यावतीने राज्य अध्यक्ष कॉ.तानाजी ठोंबरे, राज्य सेक्रेटरी कॉ.नामदेवराव चव्हाण,

राज्य सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे यांनी जाहीर केले आहे. 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतींची वसूली आणि उत्पन्नाची अट बंधनकारक केल्यामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येचा जाचक आकृतीबंध अद्याप चालू असल्यामुळे

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वसूलीच्या प्रमाणातच 50 टक्के आणि 75 टक्के वेतन मिळणार आहे. म्हणजे 10 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने किमान वेतनाचे दर पुनर्निधारित करुन ते परिमंडळ 3 मधील कर्मचार्‍यांना रु. 11,625/- आणि परिमंडल 2 मधील कर्मचार्‍यांना 13,085/- रु. मान्य केले असले.

तरी वरील शासन निर्णयामुळे त्याचा लाभ कर्मचार्‍यांना मिळणार नाही. एका हाताने देण्याचे नाटक करायचे आणि दुसर्‍या हाताने हिसकावून घ्यायचे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी संतप्त झाल्या आहेत. त्यामुळे कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी या संपात सहभागी व्हावे,

असे आवाहन सुनिल शिंदे (पाथर्डी), मारुती सावंत, कृष्णकांत आंदोरे, बलभिम काळापहाड, शैलेंद्र गायकवाड, अनिल शिंदे, महादेव शेळके, राहुल पोळ, गणेश शिंदे, संजय शेलार किरण शिंदे, शरद खोडदे, बेलकर, भांडलकर, संतोष लहासे, उगलमोगले, बाळासाहेब खेडकर, संतोष आल्हाट, गोरख शिर्के,

संजय डमाळ, सुरेश कोकाटे, उत्तम कटारे, शिवाजी दगाबाज, बाळासाहेब लोखंडे, गणेश रोहोकले, यशराज शिंदे, शब्बीर महंमद शेख, शैलेश गायकवाड, शाहूराव खंडागळे, बाळासाहेब आल्हाट, अशोक काळे, ताजुद्दीन गफूर शेख, लोकेश मोरे, भाऊसाहेब त्रिभुवन, धोंडीराम पवार यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment