कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या.

याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली.

बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर पडली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १७७ वर जाऊन पोहोचली आहे.

सारसनगर परिसरातील भवानीनगर, त्याचबरोबर केडगाव उपनगरातील शाहूनगर व एकनाथनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला आटोक्यात असलेली ही संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment