शस्त्रधरी चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- एका तरुणाच्या राहत्या घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथमध्ये घडली आहे.

चोरटे मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित तरुणाने आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक गोळा झाले त्यानंतर गस्तीवर असलेले पोलीस पथक घटनास्थळी आले. दरम्यान अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले..

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी अंधारात लोणी गावातील रस्त्याच्या कडेला लिंबू काट्यावरील कामाला असणार्‍या तरुणाच्या खोलीत घुसून मोबाईल चोर मोबाईल घेऊन पसार झाले.

यात या चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यांनी एक परप्रांतीय तरुणाला कोयता मारून चोरटे पसार झाले. त्यानंतर आरडा ओरड केल्यावर गावातील तरुण जागे झाले त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला मात्र अंधारात चोर सापडले नाही.

नगरचे गस्ती पथक देखील आले होते.यावेळी चोरट्यांची नवी पल्सर गाडी सोडून चोर पळाले. चोरट्यांची ही दुचाकी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

दरम्यान, लोणी व्यंकनाथ गावात मोबाईल चोरी करणारे हे जवळच्या एक गावातील असल्याचा संशय गावातील काहींनी व्यक्त केला.ही नवी पल्सर गाडी कुणाची आहे यावर देखील या चोरांचा तपास लागणार आहें.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe