अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!! सरकारकडे केली ही मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणार. रामलीला किंवा जनतर मंतर मैदान उपलब्द करून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे. यासाठी ११ जणांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे येऊन या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली होती,

जास्त कष्ट नकोत केवळ शेतकऱ्यांसोबत त्यांनी दोन पावले चालले तरी शेतकऱ्यांना लढण्यासाठी बळ येईल. अशी अपेक्षा व्यक्त करत जर अण्णांनी ऐकले नाही तर येथेच थाळीनाद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

याबाबत सविस्तर चर्चा झाली असून आता अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असून,रामलीला किंवा जनतर मंतर मैदान उपलब्द करून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe