अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळे येथे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदीवासी कुटूंबातील 18 ते 19 वर्षीय तरूणीवर गावातील काही प्रतिष्ठीतांनी वारंवार अत्याचार केल्याची माहीती सायंकाळी उजेडात आली.
धक्कादायक बाब म्हणजे अत्याचारानंतर त्या तरूणीस गर्भधारणा होउन शनिवारी तीने एका मुलीस जन्म दिला. अत्यंत गरीब कुटूंबातील या तरूणीवर अत्याचार झाल्यानंतर आता हे प्रकरण मिटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या
असून जवळा परिसरातील समान्य जनतेकडून त्याविषयी तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या कुटंबातील तरूणीची आई मयत झालेली असून तिचे वडील ती तरूणी असे दोघेच घरी असतात.
वडील मोलमजुरी करून कुटूंबाचा चरितार्थ चालवितात. वडील व्यसनाधिन असल्याचा फायदा घेत जवळे येथील काही प्रतिष्ठीतांनी या तरूणीशी ओळख वाढवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची माहीती पुढे आली आहे.
मुलगी गरोदर राहिल्यानंंतर काही दिवस ती घराबाहेरही आली नव्हती. तीला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर काही नागरीकांच्या मदतीने तिला नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कायदेशिर सोपस्कार पुर्ण करण्यापूर्वीच शनिवारी दुपारी तिने मुलीस जन्म दिल्याची माहीती आहे. दरम्यान या तरूणीस प्रसुतीसाठी नेण्यात आल्यानंतर गावामध्ये काही प्रतिष्ठीतांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून गरीब वडीलांना पैशांचे अमिश दाखविण्यात येत असल्याचीही माहीती पुढे आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved