कोरोना विरोधी पथकाने केला लाखभर रुपयांचा दंड वसूल  !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून नगरपालिकेच्या कोरोना विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे १ लाख ७ हजार ६५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.

कोरोनाचा संक्रमण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे अशा नियमांचे नागरिकांनी पालन करणे अपेक्षित आहे.

परंतु शहरात काही नागरिक या नियमांचे महत्व समजून न घेता त्यांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसून आले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने कठोर पाऊल उचलत अशा नागरिकांकडून दंडाची आकारणी सुरु केली.

नगरपरिषदेच्या कोरोना विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी दिडशे रुपये, चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्यांकडून पाचशे रुपये

तर सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना दोन हजार आणि नागरिकांना दोनशे रुपये अशी दंडाची आकारणी केली आहे.

संगमनेर नगरपरिषदेकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात असताना नागरिकांनीही स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे, असा या कारवाई मागील उद्देश असल्याचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी सांगतले आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी शहरातील नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था, व्यापारी, डॉक्टर्स आदींनी मोलाचे सहकार्य आत्तापर्यंत केले आहे. भविष्यातही असेच सहकार्य नागरिकांनी करावे असे आवाहन संगमनेर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment