अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रीया सुरू आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखलकरण्याअगोदर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मतदारांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील ७९ मतदारांपैकी ७१ मतदार उपस्थित होते. त्यानंतर शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी द्गिविजय आहेर यांच्याकडे जमा केला.
यावेळी जि. प. सदस्य राहुल राजळे, जि. प. सदस्या संध्या आठरे, पाथर्डी भाजपाचे अध्यक्ष माणिक खेडकर, पंचायत समिती सभापती दौंड, उपसभापती मनिषा वायकर, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सुभाष केकाण, राहुल गवळी, जवखेडेचे सरपंच सचिन नेहुल, धनंजय बडे, बंडूशेठ पठाडे, जमीर आतार आदीसह कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved