अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : नगरमध्ये बुधवारी रात्रीपासून पुन्हा पाऊस पडण्यास सुरवात झालीय, जवळपास दीड ते दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर ग्रामीण भागातील ओढे,लहान मोठे बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.
दरम्यान, बुधवारी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पारनेर या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता.
त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणी करावी लागते कि काय अशी शेतकऱ्यांना चिंता पडली होती.
मात्र बुधवारी सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर याकाळात सरासरी ५१५ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच नगर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १७८ मिलिमीटर पावसाची म्हणजे सरासरी ३५ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान मागील वर्षी २५ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८४ मिलिमीटर म्हणजेच अवघ्या १६ टक्के पावसाची नोंद झाली होती.
त्यातुलनेत यंदा जवळपास १९ टक्के पाऊस जास्त पडला आहे. गुरुवारी देखील जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews