अहमदनगर : पोलिसांना रात्रीच्यावेळी गस्त घालीत असताना वाडियापार्क जवळ अंधारात एक इसम संशयीतरित्या वावरताना आढळून आला.
पोलिसांनी त्यास हटकून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रविंद्र शंकर ताटीकोंडा वय २६, रा.सबजेल चौक, अ.नगर असे सांगितले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ धारदार कोयता व दोन मोबाईल मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.