अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले.
त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली.
याबाबत सविस्तर असे की, दि.१७ जुलै २०१९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील किशोर वाईन्स या दुकानातील दिवसभराची रक्कम घराकडे घेऊन जात असलेल्या एका व्यापारी महिलेला पिस्तुल रोखून अडवले होते.
या आरोपीकडून संबधीत महिलेच्या हातावर गोळी मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या महिलेने सावधानता दाखवल्याने हवेत गोळीबार होऊन त्या महिलेचे प्राण वाचले होते. या घटनेनंतर सदर आरोपी फरार झाला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews