अहमदनगर : मेजर असल्याची बतावणी करून अंगावर लष्काराची वर्दी घालून फिरणाऱ्या एका तोतया मेजरला लष्करी अधिकाऱ्यांनी पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
संजय विठोबा पाटील (रा.हातखंडा जि.रत्नागिरी) असे तोतया मेजरचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री माळीवाडा बसस्थानक परिसरात घडली.

याप्रकरणी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राजाराम कारभारी गवळी (रा.वाकोडी ता. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की, बुधवारी रात्री भरदार शरीरयष्टी, जवळ भोगस कागदपत्रे, अंगामध्ये लष्करी वर्दी असलेला एक व्यक्ती माळीवाडा बसस्थानक परिसरात बसमधून जाण्यासाठी आलेला असलेल्याचे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राजाराम गवळी यांनी पाहिले.
संबंधित व्यक्ती तोतया लष्करी अधिकारी असल्याचा संशय गवळी यांना आला. म्हणून त्यांनी पाटील याला विचारणा केली. परंतू, तो तोतया मेजर असल्याचे गवळी यांच्या लगेच लक्षात आले.
त्यांनी याबाबत तात्काळ काही लष्करी अधिकारी व कोतवाली पोलिसांना महिती दिली. ही माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी व जवानांनी तात्काळ बस स्थानकात धाव घेवून संबंधितास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली.
या दरम्याने तो तोतया अधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्याने लष्करी अधिकाऱ्यांनी त्यास कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बंगाळे, पोलिस नाईक भाऊसाहेब म्हस्के, पठाण हे करत आहेत.
- ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका
- पुणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट ?
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय ! २१ वा हप्ता या तारखेला मिळणार
- शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
- सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण













