अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर शहरातील तोफखाना आणि सिद्धार्थनगर हा परिसर कन्टेन्टमेंट झोन घोषित करण्यात आला होता.
त्याची मुदत आज संपत होती. मात्र, या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरातील कन्टेन्टमेंट झोनची मुदत १४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यापूर्वी दिनांक २४ जून रोजी तोफखाना आणि सिद्धार्थनगर परिसर कन्टेन्टमेंट झोन आणि या परिसराच्या लगतचा भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.
या आदेशास आता मुदतवाढ देऊन दिनांक १४ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू राहणार आहेत.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तोफखाना आणि सिद्धार्थनगर परिसरामध्ये यापुर्वी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे सदर परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.
परंतू दरम्यानच्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आणखी कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले आहेत.
या क्षेत्रातुन मोठया प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या क्षेत्राबाहेर कोरोना विषाणुचा प्रसार राखण्यासाठी हे क्षेत्र प्रतिबंधीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीतील तरतूदीनुसार कन्टेन्टमेंट झोन व बफर झोनची मुदत या आदेशाव्दारे दिनांक 14 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोणतेही व्यक्ती/ संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews