नवी दिल्ली – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली.
त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.
- 5-स्टार सेफ्टी, जबरदस्त फिचर्स ! फक्त 8.29 लाख रुपयाची ‘ही’ SUV क्रेटा आणि विटाराला टक्कर देणार
- ‘हे’ 5 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! टॉप ब्रोकरेजने दिली Buy रेटिंग
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?