कोरोनाची पीछेहाट होताच म्युकर मायकोसीने नागरिकांची चिंता वाढवली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आलेला म्युकरमायकोसिस या आजाराने आता जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे.

तसेच आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र म्युकर मायकोसिस आजराचे दुसरे संकट जिल्ह्यावर ओढवले गेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकोरमायकोसिसचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 82 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

सध्या 131 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. दरम्यान म्युकोरमायकोसिस पीडितांमध्ये 166 पुरूषांचा तर 64 महिला रुग्णांचा समावेश आहे. करोना संसर्गापाठोपाठ म्युकोरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले आहे.

करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आता म्युकोरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकोरमायकोसिस आजारावर उपचार घेणार्‍यांची माहिती घेतली जात आहे. करोनातून बरे झालेल्या काही रुग्णांत म्युकोरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आढळत आहे.

दरम्यान करोनातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकोरमायकोसिसचे लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात सापडलेल्या 130 म्युकोरमायकॉसिस रुग्णांमध्ये 227 करोना रुग्ण असून उर्वरित 3 हे सामान्य ( नॉन कोविड) रुग्ण आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News