कोरोनाचे रुग्ण वाढताच ‘त्या’ तालुक्यातील सीमा बंद !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाथर्डी तालुक्याला लागूनच असलेल्या आष्टी तालुक्यातील जनताही सावध झाली आहे.

पाथर्डी तालुक्यातील कोरोना संसर्गाचा शिरकाव आष्टी तालुक्यात होऊ नये म्हणून पाथर्डी व आष्टी तालुक्यात जोडणारा श्रीक्षेत्र वृद्धेश्वरजवळील सावरगावघाट बंद केला आहे.

आष्टी तालुक्यातील सावरगाव, गंगादेवी, शेडाळा, वेल्तुरी, देऊळगाव, मराठवाडी, हारेवाडी, दौलावडगाव, केळपिंपळगाव येथील नागरिकांची दररोज पाथर्डी तालुक्यात तिसगाव, करंजी येथील व्यापारी मार्केटमध्ये ये-जा सुरू असते.

पाथर्डी व आष्टी तालुक्याला जोडणाऱ्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथील सावरगावघाट येथे मुख्य रस्त्यावरच दगड माती टाकून या दोन्ही तालुक्यांच्या सीमा आष्टी तालुक्यातील नागरिकांनी सील केल्या आहेत.

सावरगाव घाट (ता. आष्टी) येथे पाथर्डीकडे जाणारा मुख्य रस्ताच दगड टाकून बंद करण्यात आला आहे. छाया : मयूर मुखेकर.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News