Ahmednagar breaking : संगमनेर : शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन मध्ये दिनांक ९ रोजी घडलेल्या हाणामारीप्रकरणात आपल्यासोबत उद्धट वर्तन करीत अश्लील हावभाव व शेरेबाजी झाल्याचा आरोप एका तरुणीने केल्याने माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की सोमवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये वेळ संपल्याचे कारण देत एका तरुणीला जेवण नाकारण्यात आले होते.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला होता. पीडितेसोबत आलेल्या चौघा तरुणांनी हॉटेल मालकासह तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत हॉटेलातील सामानाची तोडफोड केली होती.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन तोडफोड व मारहाण करण्यासह या गदारोळात दीड तोळे वजनाची सोनसाखळी व रोकड लांबविल्याचा आरोप केल्याने योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे व दीपक रणसुरे या चौघांवर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यानंतर संतप्त झालेल्या तरुणीने माजी नगरसेवक व हॉटेल मालकांवर पोलिसांनी किरकोळ कारवाई केल्याचा आरोप करून आंदोलन केले. यानंतर सदर तरुणीने सेलिब्रेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना लेखी स्वरूपात कळविला.
वाघचौरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पीडितेच्या पुरवणी जवाबावरुन पप्पू अभंग, माजी नगरसेवक नितीन अभंग, त्यांचे बंधू प्रवीण व अंकुश अभंग यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला