अहमदनगर ब्रेकिंग : भर चौकात तरुणावर तलवारीने हल्ला !

Published on -

पारनेर :-पूर्ववैमनस्यातून पारनेर शहरातील एक तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.शहरातील बंडू मते या युवकावर सकाळी तलवारीने हल्ला झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, या युवकाचा चहाचा व्यवसाय असुन रोजच्या प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी येत असताना ६.३० च्या सुमारास आंबेडकर चौकात त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

जखमी बंडू यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविले असुन ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असावी असा संशय व्यक्त होत आहे. शहरातील दोन तरुणांनीच हल्ला केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe