Ahmednagar Breaking : शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न, गोळी कट्ट्यात अडकली.. भर चौकात थरार!

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पारनेर शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या हॉटेल दिग्विजय समोर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला.

परंतु कट्ट्यात ही गोळी फसल्याने फक्त आवाज झाला. पुढील गोळी झाडण्याच्या आधीच तेथील एकाने पिस्तूल हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती समजताच युवराज पठारे समर्थकांनी पारनेर शहरात व पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती. आरोपी हा रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन आहे.

पारनेर शहरातील बसस्थानक परिसरात मुख्य चौकात गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता शिवसेना नगरसेवक युवराज पठारे हे आपल्या तीन ते चार मित्रांसह आले होते.

रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुणाने हातात गावठी कट्टा व चाकू घेऊन पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावला.

कट्ट्यातून आरोपीने पठारेंवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एकाने तरुणाच्या हातातील गावठी कट्टा हिसकावला.

उपस्थित तरुणांनी हल्लेखोरास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीसोबत असणारे दोन तरुण पळून गेले असून सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला आहे. त्यामुळे या सिस्टीव्हीच्या माध्यमातून अन्य दोन जणांचा शोध पारनेर पोलिस घेत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवारी सकाळी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या घटनेने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांचीच चौकशी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके, राहुल शिंदे आदींसह अनेकांनी त्यांची विचारपूस केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe