तिजोरीत भाजपा सरकारने खडखडाट करून ठेवलाय – मंत्री बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

राज्याच्या  : मंत्री थोरात राज्याच्या तिजोरीत मागील सरकारने खडखडाट करून ठेवला : मंत्री थोरात श्रीदत्त व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण सोहळ्यात बोलताना .

संगमनेर: महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. मागील सरकारने तिजोरीत खडखडाट करुन ठेवला, परंतू नवीन सरकार यातून मार्ग काढणार आहे. निळवंड्यासह अनेक अपूर्ण कामे पूर्ण करावयाची असून समृध्द व संपन्न तालुक्यासह विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करावयाचा निर्धार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुका दूध संघात श्रीदत्त व विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळ्यात थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी रणजितसिंह देशमुख होते.

व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, बाजीराव खेमनर, कांचन थोरात, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, अजय फटांगरे, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, साहेबराव गडाख, शरयू देशमुख, गणपत सांगळे, निर्मला गुंजाळ, मिलिंद कानवडे, विष्णूपंत राहटळ, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना काँग्रेसला मिळालेले यश ही समाधान देणारी बाब आहे. जीवनात नैतिकता महत्त्वाची असून संगमनेरने कायम ती जपली आहे.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी, गोरगरिब व कष्टकऱ्यांचे असून मंत्री थोरातांवर मोठी जबाबदारी आहे. स्वागत मोहनराव करंजकर यांनी केले.

प्रास्ताविक रणजितसिंह देशमुख यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. आभार साहेबराव गडाख यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment