संगमनेर :-काँग्रेस पक्ष आज भाजप-सेने विरोधात आरपारची लढाई लढत असताना, पक्षाचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या लढाईत सर्वस्व झोकून आज पक्षाचे काम करीत आहे.
मात्र, अशावेळी विरोधी पक्षनेते कोठे आहेत? आजच्या या संघर्षात त्यांचे योगदान काय? असा सवाल माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

आता विखे यांच्यावरील जनतेचा विश्वास संपला आहे. जनतेच्या मनात यांच्या तडजोडीबद्दल तिरस्कार आहे. प्रत्यक्ष प्रचाराला लागल्यावर विखे यांना याची जाणीव झाली आहे.
त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील विखेंना विरोध करायला सुरुवात केल्याचे सांगत आ. थोरात यांनी चिमटा काढला.
समन्यायी पाणीवाटप कायदा 2005 साली झाला, तेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मूग गिळून गप्प का बसले होते?
त्यांना जनतेचा खरोखरच कळवळा होता आणि कायद्याचे तोटे माहित होते तर त्यांनी त्यावेळी त्या कायद्याला विरोध का केला नाही,
असा सवाल करून हा कायदा आपण मांडलेला नाही, अशी स्पष्टोक्ती देत आ. बाळासाहेब थोरात यांनी ना. विखे पाटलांवर पलटवार केला.
- 20 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतील हे 3 वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन्स
- फक्त 4 लाखात घरी आणा AMT व्हेरियंट Renault Kwid ची जबरदस्त ऑफर
- फक्त 8 एप्रिलपर्यंत ! Brezza वर सध्या मिळतोय भलामोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
- घरबसल्या घ्या सिनेमॅटिक मज्जा, शाओमीचा 4K व्हिज्युअलचा TV लवकरच भारतात
- खुशखबर ! टाटा हॅरियरवर मिळतेय बंपर सूट, अशी संधी पुन्हा येणार नाही