नगर – गटबाजी टाळून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस कार्यरत आहे, असे शहरब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नवीन कार्यालयाच्या निमित्ताने स्पष्ट केले. शहर काँग्रेसने यापूर्वी आणिआजही कोणताही विशिष्ट गट मानला नाही.
तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसनेकार्य सुरु केले होते. ते स्वत: आज कार्यरत नाही, पण त्यांनी जी पक्षाची घडी बसवली ती तशीच पुढे नेण्याचा प्रयत्न आम्हीकरतांना गटबाजीला कधी महत्व दिले नाही. पक्षनेते म्हणून जिल्ह्यातील सर्वांचा आदर केला आहे. पक्षनिष्ठा आम्हालामहत्वाची वाटते, असेही भुजबळ यांनी म्हटले.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन शहर काँग्रेसने मंगलगेट (नगर) येथे संपर्ककार्यालय सुरु केले आहे. पर्याय किंवा गटबाजी असा कोणताही प्रकार या नवीन कार्यालयामागे नाही. सन 2003 पासून मीकाँग्रेसचे कार्य करीत असून, या दरम्यान माझी पत्नी तत्कालीन नगरसेविका व पाणी पुरवठा समिती सभापती सौ.सुनंदाभुजबळ यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी तांगेगल्ली प्रभागातून केली होती.
यावेळी मा.बाळासाहेब थोरात व आ.शिवाजीराव कर्डिलेमंत्रीपदावर होते हे दोन्ही मंत्रीमहोदय आमच्या प्रचारासाठी तांगेगल्ली भागात आले होते. त्यावेळेपासून आम्हाला थोरात साहेबयांचे मार्गदर्शन असून, त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले आहे. तो ऋणानुबंध आजपर्यंत टिकून आहे. या दरम्यान पक्षात अनेकघडामोडी झाल्या पण आम्ही मा.थोरात साहेब यांच्या पासून दूर गेला नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीपासून आणि त्यामागच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुकीपासून आ.डॉ.सुधीर तांबे आणि युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेयांच्याशी जो संबंध आला त्या-त्या वेळी आम्ही दोन्ही तांबे साहेबांच्या प्रचारातही इमाने इतबारे काम केले आहे.
यामागेवैयक्तिक स्वार्थ, हेतू नसून पक्ष आणि पक्षनिष्ठा होती. पक्षाच्या ध्येय-धोरणापासून दूर जावून वैयक्तिक स्वार्थ साधणार्याअनेक मंडळींनी आमच्यावर अन्याय केला, गैरसमज करुन दिलेत आजही तेच प्रकार होतात. तरीही आम्ही पक्षापासून जसे दूरगेलो नाही, तसे मा.थोरात आणि आ.तांबे यांच्यापासून दूर नाही. पण नगर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे,त्याबाबतच आम्ही मा.थोरात साहेब आणि आ.तांबे यांच्याशी पक्षाच्या हिताच्यादृष्टीने मत मांडलेले असून, या मताशीशहरातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहमत आहे, हे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे.
रिक्त पद ही बाब वगळता कोणत्याही नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबाबत आमच्या मनात आकास नाही,राग नाही आणिद्वेषही नाही. पक्षात असणार्या सर्वांबद्दल आम्ही समान भुमिकेतून पाहतो वैयक्तिक राग, लोभ हा भाग कधी नव्हता आणिनाही, भविष्यातही राहणार नाही. पक्षाच्या हितासाठी आणि वैचारिक भुमिका यामागे आहे. पक्षाचे राज्य प्रभारीमा.चल्लावामशीचंद रेड्डी यांनीही मध्यंतरी शहर ब्लॉककाँग्रेसचे स्वतंत्र कार्यालय असावे